रविवार, 15 डिसेंबर 2019
लक्षवेधी :
  तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी-गडचिरोली येथील तेली समाजाच्या मेळाव्यात खा.रामदास तडस यांचे आवाहन             देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा             गडचिरोलीच्या ८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड             महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका-वीज चोरीच्या आरोपावरुन ग्राहकास पाठविलेले अतिरिक्त बिल व दंड रद्द करण्याचे आदेश             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

नक्षल्यांनी केली युवकाची हत्या

Friday, 29th November 2019 03:11:23 PM

कोरची,ता.२९: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी २७ नोव्हेंबरच्या रात्री कोरची तालुक्यातील भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या १७ वर्षीय युवकाची गोळ्या घालून हत्या केली.

बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ३० ते ३५ सशस्त्र नक्षलवादी मनोज हिडकोच्या घरी गेले. त्याला झोपेतून उठवून गावातील बसथांब्यावर नेले आणि गोळ्या घालून त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी मनोजची हत्या केली.

२ डिसेंबरपासून नक्षल्यांनी पीपल्स गुर्रिल्ला आर्मीचा स्थापना करण्याचे फर्मान सोडले आहे. या सप्ताहादरम्यान दहशत पसरविण्याच्या हेतूने नक्षल्यांनी हे कृत्य केले आहे. काल(ता.२७) नक्षल्यांनी अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ झाडे आडवी टाकून व बॅनर बाधून रस्ता अडविला होता.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K9QD4
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना