गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

२ डिसेंबरपासून गोंडवाना विद्यापीठात आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव

Thursday, 28th November 2019 01:51:58 AM

गडचिरोली,ता.२८: येथील गोंडवाना विद्यापीठात १७ व्या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ चे आयोजन करण्यात आले असून, २ डिसेंबरला विद्यापीठाचे कुलपती तथा महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉ.कल्याणकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या हेतूने ‘इंद्रधनुष्य-२०१९’ च्या आयोजनाची जबाबदारी राज्यपाल महोदयांच्या कार्यालयाने गोंडवाना विद्यापीठाकडे सोपवली आहे. २ ते ६ डिसेंबर या कालावधीत राज्यातील २० विद्यापीठांमधील तरुणाई आपल्या कलेचे सप्तरंग विद्यापीठाच्या प्रांगणात उधळणार आहे. संगीत, नाटक, साहित्य, नृत्य व ललित कला या पाच प्रकारांतील २६ कलांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे. त्यासाठी ४० जणांची चमू १ डिसेंबरला गडचिरोलीत दाखल होणार आहे.

२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर व प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी उपस्थित राहतील. ६ डिसेंबरला सकाळी ११ वाजता समारोपीय कार्यक्रम होणार असून, सिने कलावंत मकरंद अनासपुरे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील, असे डॉ.कल्याणकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले, प्रा.डॉ. शशीकांत गेडाम, प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर,  प्रा.डॉ.धनराज खानोरकर, डॉ.प्रिया गेडाम, डॉ.विनायक शिंदे, डॉ.प्रीती पाटील, डॉ.दुबे उपस्थित होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9PEV1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना