गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

२ हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 23rd November 2019 02:36:12 AM

गडचिरोली,ता.२३: वडिलोपार्जीत्‍ शेती वारसदाराच्या नावावर करुन देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल(ता.२२) चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी येथील मंडळ अधिकारी विलास माधव मुप्पीडवार(४९) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.

तक्रारकर्ता हा शेतकरी असून, मालेरमाल येथील रहिवासी आहेत. तक्रारकर्त्याची वडिलोपार्जीत्‍ शेती ही वारसाहक्काप्रमाणे त्याच्या नावावर करावयाची होती. त्यासाठी त्याने मुरमुरी येथील तलाठी कार्यालयाकडे रीतसर अर्ज केला. परंतु त्याच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने मंडळ अधिकारी विलास मुप्पीडवार याची भेट घेतली. यावेळी मुप्पीडवार याने वडिलोपार्जीत्‍ शेती वारसाहक्काप्रमाणे तक्रारकर्त्याच्या नावावर तसेच इतर वारसादारांच्या नावाने फेरफार करण्यासाठी तक्रारकर्त्याला २ हजार रुपयांची लाच मागितली.

परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार काल संध्याकाळी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. यावेळी विलास मुप्पीडवार यास पंचांसमक्ष तक्रारकर्त्याकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८(संशोधन २०१९)च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक रश्‌मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, हवालदार प्रमोद ढोरे, शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडिकवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, तुळशीराम नवघरे यांनी ही कारवाई केली.

  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A1K94
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना