सोमवार, 16 डिसेंबर 2019
लक्षवेधी :
  तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी-गडचिरोली येथील तेली समाजाच्या मेळाव्यात खा.रामदास तडस यांचे आवाहन             देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा             गडचिरोलीच्या ८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड             महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका-वीज चोरीच्या आरोपावरुन ग्राहकास पाठविलेले अतिरिक्त बिल व दंड रद्द करण्याचे आदेश             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत कारवाफा संघ विजेता

Friday, 22nd November 2019 07:01:42 AM

गडचिरोली,ता.२२ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत रांगी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचा समारोप गुरुवारी २१ नोव्हेंबरला झाला. यात कारवाफा बिटाच्या संघाने विजेतेपद पटाकाविले, तर सोडे बिटाचा संघ उपविजेता ठरला.

विजेता व उपविजेता संघाला आमदार डॉ. देवराव होळी, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर यांच्या हस्ते चषक देउन गौरविण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघ व खेळाडूंना पारितोषिक वितरण करण्यात आले. या क्रीडा संमेलनात कारवाफा, सोडे, भाडभिडी, अंगारा, कोरची, या पाच बिटातील २५ शासकीय व १८ अनुदानित अशा एकूण ४३ आश्रमशाळांच्या ११०० खेळाडू सहभागी झाले होते.

परितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, अनिल सोमनकर, वंदना महल्ले, शशिकांत साळवे,सरपंच जगदीश कन्नाके, खुशाल नेवारे, प्रकाश काटेंगे, विलास भांडेकर, आशिष पिपरे, विनायक किरंगे, उपसरपंच नरेंद्र भुरसे, रांगी आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल रामटेके उपस्थित होते.या क्रीडासंमेलनाचे आयोजन सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी डाँ. इंदूराणी जाखड यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली करण्यात आले होते.

विजेता कारवाफा बिटाने  ३८३ गुण घेऊन घवघवीत यश मिळवून अव्वल स्थान पटकाविले. तर सोडे  बिटाने २८१ गुण घेऊन उपविजेते पद पटकाविले.

विजेता कारवाफा बिटात कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गडचिरोली, गोडलवाही, एकलव्य गडचिरोली या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा नऊ आश्रम शाळांचा समावेश आहे. उपविजेता सोडे बिटात सोडे, मुरूमगाव, रांगी, सावरगाव, भाकरोंडी, कुरंडीमाल या शासकीय तर आरमोरी, परसवाडी, मुरमाडी, जपतलाई या अनुदानित अशा दहा आश्रम शाळांचा समावेश आहे.

पारितोषीक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, संचालन अनिल बारसागडे व क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर तर आभार प्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक अनिल रामटेके यांनी केले.

क्रीडा संमेलनाच्या आयोजनासाठी प्रसिद्धीप्रमुख सुधीर शेंडे, ए.ए.रामटेके, प्रेमिला दहागावकर, पी.व्ही.भोयर, यु.वाय.बिसेन, टी.एम.सोनकुसरे, धनंजय वाणी बी.आर. इरखेडे, पी.के.आत्राम, अनिल कुरुडकर, व्यंकटेश चाचरकर, मंगेश ब्राम्हणकर, सुभाष लांडे, अश्विन सारवे, विनोद चलाख, संतोष गैनवार, विनायक क्षीरसागर, अजय वाकडे, सुधीर झंझाड, आशिष नंदनवार, आनंद बहिरवार, रामचंद्र टेकाम, अमित मेश्राम, संजय नेवारे, शैलेश भैसारे, बाला गडे यांचेसह क्रीडा शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
8URAJ
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना