शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  जहाल नक्षली विलास कोल्हा याचे एके-४७ सह पोलिसांपुढे आत्मसमर्पण             बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

डॉ. प्रकाश आमटे लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने बिल गेट्स यांच्या हस्ते गौरवान्वित

Sunday, 17th November 2019 03:09:49 PM

 

गडचिरोली,ता.१७: थोर समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांना आज बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.

आज संध्याकाळी नवी दिल्ली येथील आयसीएमआर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कॉसिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवेत्‍ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना  आज बिल गेट्स यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यात डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. किरण मझूमदार-शॉ यांचा  समावेश आहे.

 गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे डॉ.प्रकाश आमटे यांनी १९७३ मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. तेव्हापासून भौतिक सुविधांचा प्रचंड अभाव असतानाही डॉ.प्रकाश आमटे व डॉ.सौ.मंदाकिनी आमटे यांनी अशिक्षित व गरीब आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवून त्यांना शिक्षणाची संधीही उपलब्ध करुन दिली. लोक बिरादरी प्रकल्पामार्फत आदिवासी लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले असून त्यासाठी स्वत:चे संपूर्ण आयुष्य  समर्पित केले आहे.

यापूर्वी डॉ. प्रकाश आमटे यांना महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानै ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (डी. लिट) पदवीने गौरवान्वित केले होते. २००९ मध्ये डॉ.प्रकाश आमटे यांना रमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  डॉ.प्रकाश आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते गौरव होणं, ही बाब पुन्हा जिल्हावासीयांसाठी भूषणावह ठरली आहे.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0ORE2
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना