बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मोटिवेशनल स्पीकर सोनिया जाडाजी यांचे गडचिरोलीत पाच दिवस सेमिनार

Friday, 15th November 2019 06:16:55 AM

गडचिरोली,ता.१५: प्रख्यात मोटिवेशनल स्पीकर सोनिया जाडाजी यांचे गडचिरोली येथे विद्यार्थी व पालकांसाठी पाच दिवस नि:शुल्क मेमोरी चॅम्पीयन सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत.

चामोर्शी मार्गावरील सेलिब्रेशन फंक्शन हॉलमध्ये रविवारी १७ नोव्हेंबरला सकाळी ११ ते दुपारी १ व संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजतापर्यंत आणि १८, १९, २० व २१ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ ते रात्री ९ या वेळात हे सेमिनार होणार आहेत. या सहा सेमिनारपैकी कोणत्याही एका सेमिनारला इच्छुकांना उपस्थित राहता येईल.

सोनिया जाडाजी या मागील दहा वर्षांपासून मार्गदर्शन करीत असून, आतापर्यंत त्यांनी ८ लाख लोकांचे सेमिनार घेतले आहेत. सोनिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अलिकडे मुले मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. मोबाईल वा तत्सम वस्तू न मिळाल्यास मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही येत असतात. टीव्ही व मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे मुलांची सहनशक्ती कमी होत आहे. शिवाय डोळ्यांवरही विपरित परिणाम होत आहे. यासंदर्भात मुलांचे मन वळवून त्यांची मानसिकता कशी सकारात्मक करता येईल, याविषयीची सखोल माहिती सेमिनारमधून देण्यात येणार आहे. तसेच एकाग्रता, आत्मविश्वास व चरित्र सुधार याविषयीदेखील प्रोजेक्टरद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सोनिया जाडाजी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पीकुमार जाडाजी व कृणाल पडालवार उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
R5ZA4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना