गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

रॅली व स्वाक्षरी अभियान राबवून‘चाईल्ड लाईन’ ने केली बालहक्कांबाबत जनजागृती

Thursday, 14th November 2019 06:54:29 AM

 

 गडचिरोली,ता.१४: बालकांचे हक्क व त्यांच्यावरील अन्याय, अत्याचारासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आज बालकदिनी गडचिरोली येथे ‘चाईल्ड  लाईन १०९८’ च्या वतीने रॅली काढून स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

 बालकांचे हक्क व त्यांच्यावरील अन्याय, अत्याचारासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने ‘चाईल्ड लाईन १०९८’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा येथील ‘ आम्ही आमच्या आरोग्यासाठी’  या स्वयंसेवी संस्थेने एप्रिल २०१९ पासून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ‘काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या’ बालकांसाठी चोवीस तास १०९८ या टोल फ्री क्रमांकाची सेवा देण्यात येत आहे. या उपक्रमाचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने आज गडचिरोली येथे ‘चाईल्ड लाईनसे दोस्ती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर शहरातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. चाईल्ड लाईनचे जिल्हा प्रकल्प् समन्वयक दिनेश बोरकुटे यांनी चाईल्ड  लाईन काय आहे व त्याचा वापर कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष सविता सादमवार, सदस्य प्रा.डॉ.दिलीप बारसागडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा  माहिती  अधिकारी सचिन अडसूळ,  महेश लाडे, पोलिस  उपनिरीक्षक गोरे, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा बारसागडे, वैशाली बाबोळे,  वर्षा  मन्वर,  अर्चना  चुधरी,  प्राचार्य दुर्गम, श्री. सहारे, अॅड. अरुण अंजनकर,  अकिल शेख  उपस्थित होते. यावेळी  चाईल्ड  लाईन १०९८ चा  वापर  केव्हा आणि  कसा  करावा, चांगला स्पर्श,  वाईट स्पर्श, बालकांचे अधिकार व हक्क तसेच बालाकांसंबधी कायदे तसेच समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा, बाल मजुरी ,बाल विवाह, बाल लैंगिक  शोषण, बालकांना  भिक्षा  मागण्यास  प्रवृत्त  करणे, बालकांची तस्करी अशा विविध समस्यांवर मुलांनी घोषणा तसेच फलकाच्या माध्यमातून जनजागृती केली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी चाईल्ड लाईनचे सदस्य बंडू रायसिडाम, यामिनी चुधरी, मोनिका वासनिक, दिनेश जुळा, आकाश मडावी, पंकज कोडाप, मंजुश्री सावरकर आदींनी सहकार्य केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V41U1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना