रविवार, 15 डिसेंबर 2019
लक्षवेधी :
  तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी-गडचिरोली येथील तेली समाजाच्या मेळाव्यात खा.रामदास तडस यांचे आवाहन             देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा             गडचिरोलीच्या ८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड             महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका-वीज चोरीच्या आरोपावरुन ग्राहकास पाठविलेले अतिरिक्त बिल व दंड रद्द करण्याचे आदेश             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

पत्नीस जाळून ठार करणाऱ्या पतीस ७ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Thursday, 14th November 2019 12:54:34 PM

गडचिरोली,ता.१४: क्षुल्लक कारणावरुन पत्नीला केरोसीन ओतून जीवंत जाळणाऱ्या पतीस गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दुखीराम सुभाष बिस्वास,रा.आनंदग्राम,ता.चामोर्शी असे दोषी इसमाचे नाव आहे.

तेलंगणा राज्यातील सिरपूर तालुक्यातील रवींद्रनगर येथील परितोष मंडल यांची मुलगी अंजना हिचा विवाह आनंदग्राम येथील दुखीराम बिस्वास याच्याशी झाला होता. परंतु दुखीराम हा नेहमी क्षुल्लक

कारणावरुन अंजनास त्रास देत होता. एके दिवशी ‘तुझ्या वडिलांना दिलेले २० हजार रुपये मागून आण’, असा तगादा लावून दुखीरामने अंजनाच्या अंगावर केरोसीन ओतून तिला जाळले. यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर २६ ऑगस्ट २०१६ रोजी परितोष मंडल यांनी चामोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी दुखीराम बिस्वास याच्यावर भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आष्टी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कापडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या प्रकरणाचा निकाल लागला.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी साक्ष पुरावा तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी दुखीराम बिस्वास यास खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून ७ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात दुखीरामच्या कुटुंबातील अन्य तिघांची सबळ पुराव्याअभावी भादंवि कलम ३०४ व सहकलम १४ च्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4VHZU
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना