बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीचे जिल्हा खनिकर्म अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Monday, 11th November 2019 08:42:28 AM

 

गडचिरोली,ता.११: रेती वाहतुकीच्या परवान्यावर स्वाक्षरी करुन वाहतूक परवाना देण्याकरिता कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी(वर्ग १) श्रीकांत रमेश शेळके(३१)यास रंगेहाथ पकडून अटक केली.

तक्रारकर्ता हा रेती वाहतूक करणारा कंत्राटदार आहे. वाहतुकीच्या परवान्यावर स्वाक्षरी करण्यासाठी त्याने जिल्हा खनिकर्म अधिकाऱी शेळके याच्याशी संपर्क साधला. परंतु शेळके याने परवान्यावर स्वाक्षरी करुन तो देण्यासाठी तक्रारकर्त्याकडून १ लाख २० हजार रुपयांची मागणी केली. परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज संध्याकाळी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा खनिकर्म कार्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी श्रीकांत शेळके यास त्याच्याच कक्षात पंचांसमक्ष तक्रारकर्त्याकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८(संशोधन २०१९)च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पोलिस निरीक्षक यशवंत राऊत, सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, शिपाई सतीश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सोनी तावाडे, तुळशीराम नवघरे, घनश्याम वडेट्टीवार यांनी ही कारवाई केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
16A1H
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना