रविवार, 15 डिसेंबर 2019
लक्षवेधी :
  तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी-गडचिरोली येथील तेली समाजाच्या मेळाव्यात खा.रामदास तडस यांचे आवाहन             देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा             गडचिरोलीच्या ८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड             महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका-वीज चोरीच्या आरोपावरुन ग्राहकास पाठविलेले अतिरिक्त बिल व दंड रद्द करण्याचे आदेश             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

पोर्ला येथे ग्रामगीता वाचन सप्ताहाचा १२ नोव्हेंबरला समारोप

Monday, 11th November 2019 01:29:33 PM

 

गडचिरोली,ता.११: तालुक्यातील पोर्ला येथील स्व.तुरसाबाई दशमुखे स्मृती प्रतिष्ठान,श्री.शिव मंदिर व दैनिक ‘गडचिरोली पत्रिका’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिव मंदिर येथे आयोजित ग्रामगीता वाचन सप्ताहाचा समारोप १२ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता होणार आहे.

पोर्ला येथे दशमुखे परिवारातर्फे दरवर्षी ग्रामगीता वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदा ६ नोव्हेंबरपासून या सप्ताहास प्रारंभ झाला. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, नामदेवराव महाराज, प्रवीण मुक्तावरम, संदीप कटकूरवार यांनी सप्ताहात ग्रामगीतेवर मार्गदर्शन् केले. आज(ता.११) संध्याकाळी भाविकांनी जानवा (येगाव) येथील हभप शकुंतलाबाई मसराम यांच्या कीर्तनाचे श्रवण केले.

सप्ताहाचा समारोप मंगळवारी होणार आहे. समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खा. अशोक नेते, भाजपचे माजी प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, आ. डॉ. देवराव होळी, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार. जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ बोरकुटे, अॅड. राम मेश्राम, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, नगरसेवक रमेश भुरसे, चंद्रशेखर भडांगे, शालिकराम विधाते, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, संदीप कटकूरवार, पोर्लाचे उपसरपंच बापू फरांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधूताई दशमुखे व केशवराव दशमुखे यांनी केले आहे.  


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ZVH40
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना