शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्ह्यात ईद-ए-मिलादुन्नबी सण उत्साहात साजरा

Sunday, 10th November 2019 12:49:38 AM

गडचिरोली,ता.१०: मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलादुन्नबी हा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला.

गडचिरोली येथे मुस्लिम बांधवांनी मिरवणूक काढली. यावेळी खा.अशोक नेते यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जामा मशिदीचे  सदर  रहीम शेख,  शोएब पटेल, जावेद अली, सलिम शेख, इस्राईल शेख, इकबाल  शेख, बशीर शेख, इब्राहिम शेख, अफझल  काझी, इकरार कुरेशी, शेख, अझहर काझी, वसीम शेख  यांच्यासह अनेक  मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.

देसाईगंज येथे शीख बांधवांनी जामा मशिदीत मुस्लिम बांधवांना मिठाईचे वाटप करुन सर्वधर्मसमभाव व बंधुत्वाचा संदेश दिला. सिरोंचा, कुरखेडा, धानोरा, अहेरी, आलापल्ली, भामरागड इत्यादी ठिकाणीही मुस्लिम बांधवांनी ईद हा सण उत्साहात साजरा केला.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IO1WI
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना