शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Friday, 8th November 2019 07:27:54 AM

गडचिरोली,ता.८: अवकाळी पावसामुळे झालेली नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आज सकाळी चामोर्शी तालुक्यातील खंडाळा येथील गुणाजी वासुदेव सातपुते(४०) या शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.

गुणाजी सातपुते यांनी यंदा आपल्या शेतात धान व कपाशीची लागवड केली होती. परंतु आधीची अतिवृष्टी व अलिकडेच आलेला अवकाळी पाऊस यामुळे दोन्ही पिकांची नासाडी झाली. त्यांनी सावली येथीलआयडीबीआय बँकेच्याशाखेतून दीड लाख रुपयांचे पीक कर्ज घेतले होते. परंतु हातचे पीक गेल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. अखेर त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

तक्रारीनंतर चामोर्शी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, पोलिस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
15K4W
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना