शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

खा.अशोक नेते यांनी केली नुकसानग्रस्त धानपिकाची पाहणी

Friday, 8th November 2019 07:09:15 AM

गडचिरोली,ता.८: गडचिरोली-चिमूर निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज गडचिरोली तालुक्यातील काही गावांना भेट देऊन अवकाळी पावसामुळे नासाडी झालेल्या धानपिकाची पाहणी केली. खा.नेते यांनी जेप्रा, दिभना, अमिर्झा इत्यादी गावांमध्ये जाऊन पिकाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना नुकसानीबाबत माहिती दिली. पिकाचे सर्वेक्षण करुन शासनाकडे अहवाल पाठविण्याची सूचना खा.नेते यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. यासंदर्भात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन जिल्ह्यातील नुकसानीची माहिती देऊन मदत करण्याची मागणी करणार असल्याचे खा.नेते यांनी सांगितले.

याप्रसंगी  तहसीलदार महेंद्र गणवीर , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे,   संवर्ग विकास अधिकारी सुनीता  मरसकोल्हे, भाजपचे जिल्हा महामंत्री डॉ. भारत खटी, प्रशांत वाघरे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, बंडू झाडे, जिल्हा परिषद सदस्य  नीता साखरे  उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4A96C
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना