शुक्रवार, 24 जानेवारी 2020
लक्षवेधी :
   गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार जाहीर             विकासाद्वारेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपविणार-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन             ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात केले धरणे आंदोलन             पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोली, आरमोरीत भाजप, तर अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस विजयी

Thursday, 24th October 2019 03:22:19 PM

गडचिरोली,ता.२४: विधानसभा निवडणुकीच्या आज झालेल्या मतमोजणीत गडचिरोली व आरमोरी मतदारसंघांमध्ये मतदारांनी भाजपला पुन्हा कौल दिला, तर अहेरी क्षेत्रात भाजपला दणका देत राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून दिले.

अहेरी विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार अम्ब्रिशराव आत्राम यांना तेथील मतदारांनी पराभूत करुन जोरदार दणका दिला. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम हे १५ हजार ४५८ मतांनी विजयी झाले. रा्ष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम यांना ६० हजार १३, भाजपचे अम्ब्रिशराव आत्राम यांना ४४ हजार ५३४, तर काँग्रेसचे दीपक आत्राम ४३ हजार ५ मते मिळाली. अम्ब्रिशराव आत्राम यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सभा घेतली होती. परंतु त्या सभेचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे निकालावरुन दिसले. विशेष म्हणजे, या मतदारसंघात ‘नोटा’ला तिसऱ्या क्रमांकाची ५७६४ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड.लालसू नोगोटी हे २३८१ मतांवरच थांबले.

आरमोरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार क्रिष्णा गजबे हे २१२५४ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना ५३ हजार १०२ मते मिळाली. अपक्ष उमेदवार सुरेंद्रसिंह चंदेल यांनी तिसऱ्या क्रमांकाची २४ हजार ९३५ मते घेतली. येथे ‘नोटा’ ला ३५९६ मते मिळाली.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार डॉ.देवराव होळी ३४ हजार २९८ मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार डॉ.चंदा कोडवते यांचा पराभव केला. डॉ.होळी यांना ९७ हजार ७५२ अशी विक्रमी मते मिळवली, तर डॉ.चंदा कोडवते यांनी ६२ हजार ४५४ मते घेतली. वंचित बहुजन आघाडीचे गोपाल मगरे हे ६७०८ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ज्या शेतकरी कामगार पक्षाची खूप चर्चा झाली त्या पक्षाच्या उमेदवार जयश्री वेळदा यांना केवळ ३८७० मते मिळाली. संभाजी ब्रिगेडचे उमेदवार दिलीप मडावी यांनी ३२४९ मते घेतली. फार प्रचार न करताही अपक्ष उमेदवार संतोष मडावी यांनी ३१७०, सागर कुंभरे यांनी ३१६७, तर गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या उमेदवार ममिता हिचामी यांनी २८९१ मते घेतली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
LHX1R
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना