बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंड जमातीची संस्कृती हिंदूंपेक्षा वेगळी: एलक़े़ मडावी यांचे प्रतिपादन

Monday, 17th November 2014 06:37:17 AM

 

कोरची, ता़१७

हिंदू आणि गोंड समाजाची संस्कृती वेगळी असून, गोंड समाजाने स्वत:ला हिंदू समजू नये, असे प्रतिपादन नागपूर येथील सुप्रसिद्ध विचारवंत व ‘पताना’कार एल क़े़ मडावी यांनी केले़

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कोरची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित समाजप्रबोधन मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती शामलाल मडावी हे होते़ प्रा़ इंदल अरकरा यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले़ प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य पद्माकर मानकर, प्रतापसिंह गजभिये, आनंद चौबे, रमेश मानकर, मनोज अग्रवाल, शालिकराम कराडे, प्राचार्य देवराव गजभिये, सदरूद्दीन भामानी, किशोर साखरे, श्री़ सांडिल, डॉ़ सुरपाम उपस्थित होते़

एल क़े़ मडावी पुढे म्हणाले, गोंड आणि हिंदूची संस्कृती वेगळी आहे़ गोंड जमातीत जन्म, लग्न, मृत्यू व अन्य कार्यक्रमांच्या विधी हिंदूंच्या विधीपेक्षा वेगळ्या आहेत़ निसर्ग व निसर्गात आढळणार्‍या वस्तू ह्या गोंड समाजाच्या दैवत आहेत़ हा समाज वनस्पती आणि प्राण्यांची पूजा करतो़ त्यामुळे संस्कृती मूल्यांच्या आधारावर वंशिक ओळख इतरांपेक्षा वेगळी आहे, असेही श्री़ मडावी यांनी स्पष्ट केले़

यावेळी त्यांनी पेसा कायदा व ग्रामसभांच्या अधिकारांविषयीही माहिती दिली़ याप्रसंगी प्रा़ संजय मगर यांनी बहुजनांनी स्वत: निर्णय घेण्यास शिकावे, असे आवाहन केले़ याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले़ 

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गणेश काटेंगे, रामसुराम काटेंगे, शीतल नैताम, इजामसाय काटेंगे, रामनाथ कोरचा, झाडूराम सलामे, हेमंत मानकर, मेघशाम जमकातन, धनिराम हलामी, हिरा राऊत, सियाराम हलामी, गंगाराम कल्लो, चंदरसाय मडावी, शामलाल मडावी, जगदेव बोगा, अंताराम काटेंगे आदींनी सहकार्य केले़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VUM01
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना