शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली, अहेरीत रॅली, मॅरेथॉन, रांगोळी व चित्रकलेतून मतदानविषयक जनजागृती

Thursday, 17th October 2019 06:44:44 AM


गडचिरोली,ता.१७-जिल्हयातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी स्वीप अंतर्गत आज जिल्हयात विविध ठिकाणी रॅली, मॅरेथॉन, रांगोळी व चित्रकलेतून संदेश देण्यात आला. जिल्हयातील वेगवेगळया ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमध्ये तीन हजार अधिकारी, कर्मचारी, नागरीक व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

गडचिरोली जिल्हयातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व पारदर्शक निवडणूक होण्याकरिता मतदारांना विविध कार्यक्रमातून स्वीपमधून जनजागृती केली जाते. गडचिरोलीमधील शासकीय क्रीडांगणावर सकाळी ७ वाजता मतदार रॅली आयोजित करण्यात आली. यात ऑटोरिक्षा व बाईक रॅलीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयराठोड, अति.पोलीस अधीक्षक डॉ.मोहित गर्ग यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली श्री. मनुज जिंदाल, सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, राहुल गुप्ता उपस्थित होते.

शहरातील विविध ठिकाणी तीन रॅलीमार्फत मतदार जनजागृती करण्यात आली. यावेळी सकाळी डॉ.मोहित गर्ग यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. जिल्हाभरातून आलेल्या प्रथमत: मतदार म्हणून नोंद झालेल्या नवमतदारांचे गुलाब पुष्प देऊन यावेळी स्वागतही करण्यात आले.

याचवेळी अहेरी येथे आलापल्ली येथे जिल्हयाचे निवडणूक आयकॉन कांस्यपदक विजेते ओंकार ओतारी यांच्या उपसिथतीमध्ये रन फॉर वोट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहेरी निवडणुक निर्णय अधिकारी लोणारकर, गटविकास अधिकारी महेश डोके उपसिथत होते. युवकांनी यावेळी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविली. विजेत्यांना यावेळी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात  आले.

गडचिरोली शहरात रॅलीच्या आयोजनानंतर रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी महिला, मुली यांनी रांगोळी काढून मतदान करा हा संदेश रांगोळी मधून दिला. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. रंगांच्या सहाय्याने विविध संदेश देवून त्यांनी मतदार जनजागृती केली. यावेळी रांगोळी स्पर्धेत श्रुती बारापात्रे हिने प्रथम, जागृती बारापात्रे हिने द्वितीय, तर श्रुती बोरकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेत लक्ष्मी बानबले हिने प्रथम, प्रशांत बनकर याने द्वितीय, तर स्नेहल पोगळे हिने तृतीय क्रमांक पटकावला. याव्यतिरीक्त दोन्ही प्रकारात प्रत्येकी दहा स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे वितरीत करण्यात आली.

आज झालेल्या मतदान जनजागृतीसाठी शालेय शिक्षक, विविध शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, माविमअंतर्गत असलेल्या बचत गटांच्या महिला, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी, क्रीडा विभागाशी संलग्न युवा-युवती, शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी, युवा मतदार व नागरीक यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये स्वीपमधून शिक्षणाधिकारी आर निकम, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, नोडल अधिकारी सागर पाटिल, स्वीप सदस्य कृष्णारेड्डी, जनसंपर्क अधिकारी प्रशांत दिवटे, नायब तहसिलदार सुनिल चुडगूलवार काम पाहिले.

कार्यक्रमावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी आलुस्कर, जिल्हा आरोग्य अधिकारी शंभरकर,.महेंद्र गणवीर  तहसिलदार गडचिरोली तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारी,गटविकास अधिकारी सुनीता  मरस्कोले, मुख्याधिकारी संजीव ओहोळ, जिल्हा नोडल अधिकारी अमित पुंडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन क्रीडाधिकारी मदन  टापरे यांनी केले. स्वीप सदस्य कृष्णा रेड्डी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी राज धुडसे निवडणूक लिपीक, प्रवीण आदे अव्वल कारकून, किशोर मडावी अव्वल कारकून, रोहित भादेकर लिपीक, गणेश गेडाम लिपीक, विवेक दुधबळे लिपीक यांनी विशेष सहकार्य केले. सदर कार्यक्रमातील रांगोळी स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्रा. संध्या येलेकर, अबोली लांबे, विणा हेमके,  तसेच चित्रकला स्पर्धेकरिता एस.बी.धात्रक, संजय घोटेकर, दिलीप धोडरे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
RU44C
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना