शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

आंनदराव गेडाम, जीवन नाट यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर

Tuesday, 15th October 2019 11:47:25 PM

 

गडचिरोली,ता.१६: आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवाराचे अपहरण करुन त्यांना रात्रभर

बसवून ठेवल्याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आज आनंदराव गेडाम व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन नाट यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला.

आरमोरी पंचायत समितीचे माजी सभापती असलेले बग्गूजी ताडाम हे आरमोरी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आपण आपल्या दोन सहकाऱ्यांसह मोटारसायकलने जात असताना बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी आपणास अडवून मारहाण केली. त्यानंतर कढोली गावाजवळच्या पुलावर नेऊन प्रचार न करण्याची धमकी दिली. त्यानंतर कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नेऊन रात्रभर बसवून ठेवले, अशी तक्रार श्री.ताडाम आरमोरी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन पोलिसांनी १० ऑक्टोबरला रात्री आनंदराव गेडाम, त्यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व अन्य ११ जणांवर गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून आनंदराव गेडाम हे फरार होते.

आनंदराव गेडाम व जीवन नाट यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. यामुळे गेडाम यांच्या अडचणी वाढणार आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KA6BY
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना