मंगळवार, 23 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

लोकबिरादरीच्या कार्यकर्त्यांनी आदिवासींमध्ये केली अंधश्रद्धेबाबत जनजागृती

Sunday, 13th October 2019 01:30:03 AM

गडचिरोली,ता.१३: भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील कार्यर्क्त्यांनी आज आदिवासीबहुल कोयनगुडा येथे अंधश्रदधा व व्यसनमुक्तीबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली.

यावेळी कार्यकर्त्यांनी मराठी व माडिया अशा दोन्ही भाषांमध्ये पथनाट्य सादर केले. गावातील कुरमा घर, सर्पदंश, अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती यावर माहिती दिली. याप्रसंगी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी गावाकऱ्यांशी संवाद साधून वाईट प्रथा सोडण्याचे आवाहन  केले. शिवाय तशी प्रतिज्ञाही वदवून घेतली. कोयनगुडा गावाला आदर्श गाव बनविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. लवकरच गावातील गोटुलची संपूर्ण दुरुस्ती करुन मोठे शेड बांधून देणार असल्याची माहिती अनिकेत आमटे यांनी गावकऱ्यांना दिली.

या उपक्रमात लोकबिरादरी प्रकल्पाचे कार्यकर्ते अशोक, कांचन, अस्मिता, शिल्पा, वैभवी सहभागी झाले होते. शिवाय शाळेचे विद्यार्थी, पालक, गावकरी तसेच मुख्याध्यापक विनीत पद्मावार उपस्थित होते


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7VS06
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना