रविवार, 20 ऑक्टोबर 2019
लक्षवेधी :
  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्याटक्केवारीचा विक्रम पार करणार: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला विश्वास             प्रचारतोफा थंडावल्या; गुप्त प्रचारात गुंतले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते             मतविभाजन टाळण्यासाठी पुरोगामी राजकीय पक्ष व संघटनांनी शेकापला मदत करावी-शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांचे आवाहन             विधानसभा निवडणूक: गडचिरोली जिल्ह्यातील ४७० गावांमध्ये दारुमुक्त निवडणुकीचे ठराव, नवऱ्याला दारु पाजणाऱ्या उमेदवारास पाडण्याचा महिलांचा निर्धार             आदिवासींनीच केंद्रातील सरकार व मोदींना पंतप्रधान बनवलं-आलापल्ली येथील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

चातगाव दलम कमांडरसह ७ नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Wednesday, 9th October 2019 02:53:06 PM

गडचिरोली,ता.९: विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या चातगाव दलमच्या कमांडरसह ७ नक्षल्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसपर्मण केले. त्यांच्यावर सुमारे ३३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते.

राकेश उर्फ गणेश सनकू आचला (३४), देविदास उर्फ मनिराम सोनू आचला, रेश्मा उर्फ जाई दुलसू कोवाची (१९),  अखिला उर्फ राधे झुरे (२७),शिवा विज्या पोटावी (२२),करूणा उर्फ कुम्मे रामसिंग मडावी (२२) व राहूल उर्फ दामजी सोमजी पल्लो (२५) अशी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांची नावे आहेत. यातील राकेश आचला हा चातगाव दलमचा कमांडर तर देविदास आचला हा उपकमांडर होता. आत्मसमर्पण करणाऱ्यांवर चकमक, खून व जाळपोळीचे अनेक गुन्हे दाखल होते.  

माओवादी हे अल्पवयीन आदिवासी मुलींना पळवून नेऊन बळजबरीने त्यांना दलममध्ये भरती करीत होते, तसेच विकास कामात आडकाठी निर्माण करणे, या बाबींना कंटाळून ७ नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे २०१९ मध्ये आजपर्यंत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासमोर एकूण २३ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात ३ डिव्हीसी, १ दलम कमांडर, १ दलम उपकमांडर, १७ सदस्य, १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. तर २१ मावाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यामध्ये डी.के.एस.झेड.सी. मेंबर २, दलम कमांडर १, सदस्य ३, पार्टी मेंबर २, समर्थक १३ यांचा समावेश आहे.
पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोहीत गर्ग, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित होते.
 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
K38A8
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना