गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

केंद्रप्रमुखांनी गिरविले शाळा तंबाखूमुक्त करण्याचे धडे

Monday, 17th November 2014 02:55:21 AM

 
गडचिरोली, ता़१७
अलिकडे तंबाखू व तंबाखूयुक्त पदार्थाच्या सेवनामुळे कॅन्सरसारख्या भयावह आजारांचे प्रमाण वाढत आहे़ संपूर्ण समाज तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त व्हावा, यासाठी बालकांवर संस्कार करणे महत्त्वाचे असल्याने ‘सर्च’ संस्थेने नुकतेच केंद्रप्रमुखांना ‘तंबाखूमुक्त शाळा’  करण्याचे प्रशिक्षण दिले़ आतापर्यंत ८८ केंद्रप्रमुखांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला़ 
राज्य शासनाने सुगंधित तंबाखू विक्रीवर प्रतिबंध घालूनही बिनबोभाटपणे तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे़ युवकांसह मोठी माणसे, महिला व शाळकरी विद्यार्थीही या व्यसनाच्या आहारी जात असून, त्यांना दुष्परिणाम भोगावे लागत आहेत़ त्यामुळे भावी पिढी तंबाखूमुक्त व्हावी म्हणून विद्यार्थ्यांवरच संस्कार रुजविणे गरजेचे आहे़ त्यासाठी ‘सर्च’संस्थेने नुकतेच केंद्रप्रमुखांचे एक शिबिर आयोजित केले होते़ या शिबिरातून केंद्रप्रमुखांनी नेमकी माहिती संपादन करून तंबाखूच्या दुष्परिणामांंबाबत आपापल्या केंद्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, हा त्यामागचा हेतू होता़ सुरुवातीला गडचिरोली येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत जीवन कौशल्य व व्यक्तीमत्व विकास यावर, तर ‘सर्च’ मध्ये दररोज ३० केंद्रप्रमुखांना ‘तंबाखूमुक्त शाळा’याविषयाचे प्रशिक्षण देण्यात आले़ डॉ़ अभय बंग यांच्यासह व्यसनमुक्ती केंद्राचे संतोष सावळकर, प्रभाकर केळझरकर, डॉ़ योेगेश कालकोंडे, प्रमोद कोटांगले यांनी तंबाखूमुक्ती या विषयावर खेळ, गाणी, बोधकथा, पीपीटी, गटचर्चा, संवाद अशा विविध पद्धतींचा वापर करून मार्गदर्शन केले़

जिल्ह्यातील तंबाखू सेवनाच्या समस्येचे स्वरूप, सवय कशी लागते, तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखूमुक्तीचे उपाय, तंबाखूबंदीचे कायदे, शाळेकरिता तंबाखूमुक्ती कार्यक्रम, संकल्प इत्यादी बाबी प्रशिक्षणात शिकविण्यात आल्या़ निवडक साहित्यही केंद्रप्रमुखांना देण्यात आले़ आपल्या अखत्यारितील मुख्याध्यापक व शिक्षकांना तंबाखूमुक्तीचे प्रशिक्षण कसे द्यावे, याचा सरावही केंद्रप्रमुखांकडून करवून घेण्यात आला़ डॉ़ अभय बंग यांनी तंबाखूमुक्ती कार्यक्रमाकरिता केंद्रप्रमुखांना शुभेच्छा दिल्या़ प्रशिक्षणाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बी़जी़चौरे, पवन मानकर, धनंजय चापले, प्रवीणकुमार पाईकराव उपस्थित होते़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता व शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचे प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
005T9
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना