रविवार, 20 ऑक्टोबर 2019
लक्षवेधी :
  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्याटक्केवारीचा विक्रम पार करणार: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला विश्वास             प्रचारतोफा थंडावल्या; गुप्त प्रचारात गुंतले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते             मतविभाजन टाळण्यासाठी पुरोगामी राजकीय पक्ष व संघटनांनी शेकापला मदत करावी-शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांचे आवाहन             विधानसभा निवडणूक: गडचिरोली जिल्ह्यातील ४७० गावांमध्ये दारुमुक्त निवडणुकीचे ठराव, नवऱ्याला दारु पाजणाऱ्या उमेदवारास पाडण्याचा महिलांचा निर्धार             आदिवासींनीच केंद्रातील सरकार व मोदींना पंतप्रधान बनवलं-आलापल्ली येथील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

अहेरी मतदारसंघात तीन अर्ज अवैध; गडचिरोली, आरमोरीत सर्व ‘ओके’

Saturday, 5th October 2019 02:41:38 PM

गडचिरोली,ता.५: विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. त्यात अहेरी मतदारसंघांमध्ये तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. मात्र गडचिरोली व आरमोरी या दोन मतदारसंघांमध्ये सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.  

आरमोरी विधानसभा क्षेत्रात १७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. सर्व जणांचे अर्ज वैध ठरले. गडचिरोली क्षेत्रातही १७ पैकी १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले. अहेरी विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३ जणांचे अर्ज अवैध ठरले. त्यात सतीश मडावी(अपक्ष), भारती इष्टाम व भाग्यश्री आत्राम यांचा समावेश आहे.

अहेरी विधानसभा क्षेत्रात १० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यात अम्ब्रिशराव आत्राम(भाजप), दीपक आत्राम(भाराकाँ), धर्मरावबाबा आत्राम(राष्ट्रवादी काँग्रेस), मधुकर सडमेक(बसपा), नागेश तोर्रेम(शेकाप), लालसू नोगोटी(वंचित बहुजन आघाडी), अजय आत्राम(अपक्ष), कैलाश कोरेते(अपक्ष), दिनेश मडावी(अपक्ष) व संदीप कोरेत(अपक्ष) यांचा समावेश आहे.

आरमोरी क्षेत्रातून कृष्णा गजबे(भाजप), आनंदराव गेडाम(काँग्रेस), दिलीप परचाके(भाकप), रमेश कोरचा(वंचित बहुजन आघाडी), मुकेश नरोटे(विदर्भ राज्य आघाडी), नीलेश कोडापे(अपक्ष), तानाजी दुधकुंवर(अपक्ष) नीताराम कुमरे(अपक्ष), बग्गू ताडाम(अपक्ष), अनिल कुमरे(अपक्ष), वामन सावसागडे(अपक्ष), रमेश मानागडे(अपक्ष), सुरेंद्रसिंह चंदेल(अपक्ष), मनेश्वर मडावी(अपक्ष), कवडू सहारे(अपक्ष), बाळकृष्ण सडमेक(बसपा) या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डॉ.देवराव होळी(भाजप), डॉ.चंदा नितीन कोडवते(भाराकाँ), जयश्री वेळदा(शेकाप), सागर कुंभरे(अपक्ष), चांगदास मसराम(अपक्ष), गोपाल मगरे(वंचित बहुजन आघाडी),दिलीप मडावी(संभाजी ब्रिगेड), सतीश कुसराम(एपीआय), संतोष मडावी(अपक्ष), मन्साराम आत्राम(अपक्ष), शिवाजी नरोटे(अपक्ष), संतोष सोयाम(अपक्ष), केसरी कुमरे(अपक्ष), गुलाबराव मडावी(अपक्ष), दिवाकर पेंदाम(अपक्ष), अक्षमलाल सिडाम(बसपा), व ममिता हिचामी(गोंडवाना गणतंत्र पार्टी) या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. ७ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, त्या दिवशी किती उमेदवार रिंगणात आहेत, हे स्पष्ट होणार आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5PKO0
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना