गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

शेतकरी कामगार पक्षाने अखेर गडचिरोलीत उमेदवारी केली दाखल.

Friday, 4th October 2019 08:14:36 AM

गडचिरोली, ता.४ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला विदर्भातील एकमेव गडचिरोलीची जागा न सोडल्याने शेकापच्या जिल्हा मध्यवर्ती समितीने जिल्ह्यातील तीनही विधानसभा पक्षाच्या ‘खटारा’ चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काल अहेरीत भाई नागेश तोर्रेम यांची उमेदवारी दाखल केल्यानंतर आज गडचिरोलीत शेकापच्या उमेदवार जयश्री वेळदा शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षाचा निवडणूक चिन्ह असलेला 'खटारा' घेवून निवडणूक निर्णय अधिका-यांचे कार्यालय गाठले व शक्तीप्रदर्शनासह आपली उमेदवारी दाखल करीत विधानसभा क्षेत्रातील जनतेचे लक्ष वेधून घेतले.

शेकापच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयापासून निघालेल्या रँलीत शेतकरी, शेतमजूर, कष्टक-यांसह तरुणही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, खजिनदार भाई शामसुंदर उराडे,सहकार जिल्हाध्यक्ष मोरेश्वर कुनघाडकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, नरेश मेश्राम, रोहिदास कुमरे,दिनेश चुधरी, प्रदीप आभारे,रामकृष्ण धोटे,गंगाधर बोमनवार, विजया मेश्राम,सावित्री गेडाम,संगिता चांदेकर, लक्ष्मी भगत, वनिता जवादे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
C4IPG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना