रविवार, 15 डिसेंबर 2019
लक्षवेधी :
  तेली समाजाने संघटित होऊन ताकद दाखवून द्यावी-गडचिरोली येथील तेली समाजाच्या मेळाव्यात खा.रामदास तडस यांचे आवाहन             देसाईगंज येथील राष्ट्रीय लोक अदालतीत ६३ प्रकरणांचा निपटारा             गडचिरोलीच्या ८ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड             महावितरणला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचा दणका-वीज चोरीच्या आरोपावरुन ग्राहकास पाठविलेले अतिरिक्त बिल व दंड रद्द करण्याचे आदेश             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

भरदिवसा गळयातील मंगळसूत्र ओढून चोर पसार

Friday, 4th October 2019 02:25:30 PM

 

गडचिरोली, ता.४ : देवीचे दर्शन करुन घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलवरील चोरट्याने लांबविल्याची घटना आज दुपारी साडेअकरा वाजताच्या सुमारास शहरातील रामनगर कॅम्प एरियात घडली.

मालुताई गोपीदास म्हशाखेत्री ह्या घराजवळ असलेल्या अ‍ॅड.मांडवे यांच्या घरी देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन परत येत असताना ३० ते ३५ वयाचा एक युवक मोटारसायकलने जवळ आला. त्यानंतर त्याने मालुताईच्या गळ्यातील ३८ ग्रॅमचे मंगळसूत्र ओढून पोबारा केला. घटनास्थळावरून पळ काढत असताना देवी जवळील काही स्त्रियांनी पाठलाग केला. मात्र तो वेगाने मोटारसायकल घेऊन पळाला. अज्ञात चोरट्याने काळ्यापिवळया रंगाचा चेकचा शर्ट व काळया रंगाचा पॅन्ट परिधान केला होता. त्याने चेहऱ्यावर काळया रंगाची रूमाल बांधली होती. घटनेची तक्रार गडचिरोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FJD64
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना