शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

पेंढरीच्या जंगलातून नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त

Friday, 4th October 2019 06:17:21 AM

गडचिरोली,ता.४: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काल(ता.३) धानोरा तालुक्यातील पेंढरी जंगलातून नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेला मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

पोलिस विभागाच्या सी-६० पथकाचे जवान पेंढरी जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्यांना जमिनीत स्फोटके व इतर साहित्य्‍ पुरुन ठेवल्याचे लक्षात आले. जवानांनी दोन इंच लांबीचे १४ मोटार सेल, १४ हँड ग्रेनेड, १५ किलो जिलेटिन, डिटोनेटरसह ५ ते ७ किलो वजनाचा स्फोटके असलेला जीवंत प्रेशर कूकर, आयडीसह एक कुकर बॉम्ब, वायर, नक्षली गणवेश, बॅनर, बटन, विद्युत साहित्य जप्त केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस व निवडणूक अधिकाऱ्यांचा घातपात करण्यासाठी नक्षल्यांनी स्फोटके पुरुन ठेवली होती. परंतु पोलिसांनी नक्षल्यांचा डाव उधळून लावल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जवानांचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JI6AZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना