रविवार, 20 ऑक्टोबर 2019
लक्षवेधी :
  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्याटक्केवारीचा विक्रम पार करणार: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला विश्वास             प्रचारतोफा थंडावल्या; गुप्त प्रचारात गुंतले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते             मतविभाजन टाळण्यासाठी पुरोगामी राजकीय पक्ष व संघटनांनी शेकापला मदत करावी-शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांचे आवाहन             विधानसभा निवडणूक: गडचिरोली जिल्ह्यातील ४७० गावांमध्ये दारुमुक्त निवडणुकीचे ठराव, नवऱ्याला दारु पाजणाऱ्या उमेदवारास पाडण्याचा महिलांचा निर्धार             आदिवासींनीच केंद्रातील सरकार व मोदींना पंतप्रधान बनवलं-आलापल्ली येथील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

१० उमेदवारांचे १५ अर्ज दाखल

Thursday, 3rd October 2019 02:09:40 PM

गडचिरोली,ता.३: विधानसभा निवडणुकीसाठी आज जिल्ह्यातील तीन मतदारसंघात १० उमेदवारांनी १५ अर्ज दाखल केले. आरमोरी मतदारसंघात विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांनी रॅली काढून शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

आरमोरी विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांनी भाजपतर्फे दोन उमेदवारी अर्ज सादर केले. काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांनी एक, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे दिलीप परचाके यांनी दोन अर्ज सादर केले.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांनी भाजपतर्फे दोन अर्ज सादर केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉ.चंदा कोडवते यांनीही अर्ज दाखल केला. संभाजी ब्रिगेडचे दिलीप मडावी यांनी तीन अर्ज दाखल केले. सागर कुंभरे(अपक्ष) व चांगदास मसराम(अपक्ष) व वंचित बहुजन आघाडीचे गोपाल मगरे यांनी प्रत्येकी एक अर्ज सादर केला. अहेरी विधानसभा क्षेत्रातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे दीपक आत्राम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आरमोरी येथे कृष्णा गजबे यांनी रॅली काढून अर्ज दाखल केला. यावेळी खा.अशोक नेते, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

४ तारखेला होणार शक्तीप्रदर्शन

शुक्रवार ४ ऑक्टोबर ही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख्‍ आहे. या दिवशी आरमोरीतून काँग्रेसचे आनंदराव गेडाम, गडचिरोलीतून भाजपचे विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या डॉ.चंदा कोडवते, शेतकरी कामगार पक्षाच्या जयश्री वेळदा, अहेरीतून भाजपचे विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम व काँग्रेसचे दीपक आत्राम हे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. याशिवाय अन्य उमेदवारही आपापले अर्ज भरणार आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
AV1U5
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना