बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

समाजसेवक देवाजी तोफा यांना गोंडवाना विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार जाहीर

Thursday, 26th September 2019 07:43:53 AM

गडचिरोली,ता.२६: येथील गोंडवाना विद्यापीठातर्फे दिला जाणारा जीवन साधना गौरव पुरस्कार समाजसेवक देवाजी तोफा यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कुलगुरु डॉ.कल्याणकर यांनी सांगितले की, २ ऑक्टोबर रोजी गोंडवाना विद्यापीठाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आयोजित वर्धापन दिन कार्यक्रमात देवाजी तोफा यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रख्यात पत्रकार व साहित्यिक अमर हबीब यांच्या हस्ते श्री.तोफा यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात विद्यापीठ, तसेच विद्यापीठांतर्गत कार्यरत विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे, असे डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.

देवाजी तोफा हे धानोरा तालुक्यातील मेंढा(लेखा) येथील रहिवासी असून, त्यांनी जल, जंगल व जमिनीच्या हक्काबाबत मोठे काम केले आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांनी गावाला स्वयंपूर्ण केले आहे, असे डॉ.कल्याणकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A6Z40
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना