रविवार, 20 ऑक्टोबर 2019
लक्षवेधी :
  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्याटक्केवारीचा विक्रम पार करणार: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला विश्वास             प्रचारतोफा थंडावल्या; गुप्त प्रचारात गुंतले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते             मतविभाजन टाळण्यासाठी पुरोगामी राजकीय पक्ष व संघटनांनी शेकापला मदत करावी-शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांचे आवाहन             विधानसभा निवडणूक: गडचिरोली जिल्ह्यातील ४७० गावांमध्ये दारुमुक्त निवडणुकीचे ठराव, नवऱ्याला दारु पाजणाऱ्या उमेदवारास पाडण्याचा महिलांचा निर्धार             आदिवासींनीच केंद्रातील सरकार व मोदींना पंतप्रधान बनवलं-आलापल्ली येथील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास

Saturday, 21st September 2019 02:52:50 PM

गडचिरोली, ता.२१: अल्पवयीन मुलीला घरात कोंडून तिच्यावर बळजबरी  करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सुरेश मंगलू मडावी रा.कोलाटोला, ता. कोरची असे शिक्षा झालेल्या इसमाचे नाव आहे.

ही घटना आहे १८ फेब्रुवारी २०१८ ची. आरोपी सुरेश मडावी हा पीडित अल्पवयीन मुलीच्या घराजवळ बकऱ्या चारत होता. त्याने पीडितेला आपल्या जवळ बोलावले. परंतु तिने जाण्यास नकार दिला असता आरोपीने तिला आपल्या घरी नेले. घरात कोंडून तिच्यावर बळजबरी केली. काही वेळाने पीडितेची बहीण व आजीने तिची सुटका केली. दुसऱ्या दिवशी पीडित मुलीने कोरची पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सुरेश मडावी याच्यावर भादंवि कलम ३४२, ३५४(अ), तसेच बा.लै.अ. कायद्याच्या कलम ४ व ८ अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. तपास पूर्ण होताच पोलिस उपनिरीक्षक गोरखनाथ दहीफळे यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. मुख्य  जिल्हा व सत्र न्यायाधीश  आर. एन.  मेहरे  यांनी  पीडित मुलगी व अन्य साक्षदारांचे बयाण, तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी सुरेश मडावी यास ५ वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच पीडित मुलीला भरपाई म्हणून ५ हजार रुपये देण्याचाही आदेश दिला.

सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश तुंकलवार यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
ZXUYZ
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना