मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

गडचिरोली-आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे खा.नेतेंच्या हस्ते भूमिपूजन

Friday, 20th September 2019 02:14:44 AM

गडचिरोली,ता.२०: गडचिरोली-चामोर्शी-आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन आज खा.अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता आशिष आवळे, शाखा अभियंता दीपक आंबुलकर, कनिष्ठ अभियंता लंजे, औरंगाबादच्या एजी कॉन्ट्रॅक्टर्सचे किशोर गायकवाड, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक रमेश भुरसे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री डॉ.भरत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, रा.स्व.संघाचे गोविंद सारडा, जिल्हा कोषाध्यक्ष नंदकिशोर काबरा, भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार, भाजपचे तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, प्रकाश अर्जुनवार, भाजयुमो जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, ज्येष्ठ नेत्या वच्छलाबाई मुनघाटे, शहर महामंत्री अविनाश विश्रोजवार, विनोद देवोजवार, झोपडपट्टी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्याम वाढई, व्यापारी आघाडीचे कार्याध्यक्ष श्रीकांत पतरंगे, राकेश राचमलवार उपस्थित होते.

 गडचिरोली ते सेमाना , शिवणी ते चामोर्शी सोनापूर पर्यंत तसेच अड्याळ ते येणापूरपर्यंतचा रस्ता सिमेंट कॉक्रीटचा राहणार असून, दोन पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे, तर उर्वरित सेमाना ते शिवणी, सोनापूर ते अड्याळ व येणापूर ते आष्टीपर्यंतचा रस्ता डांबरीकरणचा राहणार आहे. गडचिरोली ते चामोर्शी- आष्टी रस्ता अत्यंत खराब  झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या बाबींची गंभीर दखल घेऊन  रस्त्याचे काम उत्तम दर्जाचे करण्यात यावे व काम  तत्काळ सुरू करून  ८ ते १० महिन्यांत जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना दिल्या. राष्ट्रीय महामार्ग जिल्हा विकासामधील दुवा ठरेल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी यावेळी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
69Y60
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना