रविवार, 20 ऑक्टोबर 2019
लक्षवेधी :
  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्याटक्केवारीचा विक्रम पार करणार: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला विश्वास             प्रचारतोफा थंडावल्या; गुप्त प्रचारात गुंतले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते             मतविभाजन टाळण्यासाठी पुरोगामी राजकीय पक्ष व संघटनांनी शेकापला मदत करावी-शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांचे आवाहन             विधानसभा निवडणूक: गडचिरोली जिल्ह्यातील ४७० गावांमध्ये दारुमुक्त निवडणुकीचे ठराव, नवऱ्याला दारु पाजणाऱ्या उमेदवारास पाडण्याचा महिलांचा निर्धार             आदिवासींनीच केंद्रातील सरकार व मोदींना पंतप्रधान बनवलं-आलापल्ली येथील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोली जिल्हा परिषदेला २ कोटी ८६ लाखांचा गंडा: बनावट धनादेशाद्वारे उचलली रक्कम

Thursday, 19th September 2019 03:39:05 PM

गडचिरोली,ता.१९: गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाच्या ‘माजी मालगुजारी तलावांची पुनर्बांधणी व बळकटीकरण’ लेखाशीर्षांतर्गत्‍ युनियन बँकेत असलेल्या निधीतून बनावट धनादेशाद्‌वारे २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रूपयांची उचल केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंता भूमेश दमाहे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत ‘माजी मालगुजारी तलावांची पुनर्बाधणी व बळकटीकरण’ लेखाशीर्षांत गडचिरोली येथील युनियन बँकेच्या खात्यात सुमारे ६ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. अलीकडेच या खात्याची तपासणी केली असता लेखाशीर्ष व बँकेतील रकमेचा ताळमेळ जुळून आला नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी बँकेत जाऊन शहानिशा केली असता मूळ धनादेश जिल्हा परिषदेकडे असून, एका बनावट धनादेशाद्वारे २ कोटी ८६ लाख १३ हजार ८६१ रुपयांची उचल करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या स्कॅन करुन वापरण्यात आल्या. तसेच बनावट पत्रसुद्धा तयार करण्यात आले. ३ जून २०१९ रोजी हे बनावट पत्र तयार करुन ७ जून रोजी धनादेश बँकेत जमा करण्यात आला. बनावट पत्रावर असलेल्या पाच खाते क्रमांकावर १० जून रोजी आरटीजीएसद्वारे ही रक्कम वळती करण्यात आली. भंडारा, वरोरा, चंद्रपूर, वर्धा अशा विविध ठिकाणच्या बँकांमधून आरोपीने रकमेची उचल केली असल्याचा धक्कादायक प्रकार बँकेच्या अहवालातून निदर्शनास आला आहे. सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता भूमेश दमाहे यांनी आज गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरुन गडचिरोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक. ४५८/२०१९, भादंवि कलम ४२०,४६५, ४६७,४६८, ४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप चौगावकर हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मोठी रक्कम लंपास करण्यास आशीर्वाद कुणाचा?

गडचिरोली जिल्हा परिषदेत अनेक कामांत गैरव्यवहार होत असतो. यापूर्वी अनेक रस्त्यांची कामे न करताच देयके उचलण्यात आली आहेत. कुठे गरज नसताना जाणीवपूर्वक अंदाजपत्रक तयार करुन निधी लाटण्याचे काम होत आहे. सिंचन विभागात झालेला गैरव्यवहार अशा काही भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने तर झाला नाही ना, अशी शंका घेण्यास बराच वाव आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7KW7S
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना