सोमवार, 20 जानेवारी 2020
लक्षवेधी :
  चातगाव वनपरिक्षेत्रातील अमिर्झा बिटात वाघिणीचा मृत्यू, भुकेमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज             गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सभापतिपदांवर भाजप-राष्ट्रवादी युतीचा वरचष्मा, काँग्रेसचा दारुण पराभव             गडचिरोली जिल्हा परिषदेचे चार सदस्य अपघातात गंभीर जखमी-कुरखेडा तालुक्यातील लेंडारी गावाजवळची घटना             प्रशासनाने घडविले गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना 'इस्रो'चे दर्शन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा कुंभीवासीयांचा इशारा

Thursday, 19th September 2019 09:33:33 AM

गडचिरोली, ता.१९: नदीवर पूल नसल्याने तीन वर्षांत दोन मुलांचे जीव गेले. बैलजोड्याही वाहून गेल्या, शेतीचे अतोनात नुकसान झाले. परंतु ना प्रशासनाने दखल घेतली, ना लोकप्रतिनिधींनी. त्यामुळे गावातील सर्व मतदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा कुंभी(मोकासा) येथील गावकऱ्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.

कुंभी येथील अनेक महिला व पुरुष आज गडचिरोलीत आले होते. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुंभी(मोकासा)हे गाव गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. कुंभी गावची लोकसंख्या ३७५ तर शेजारच्या माडेमूल गावची लोकसंख्या ३५० च्या आसपास आहे. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे गावातील २० ते २५ विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी चांदाळा, गडचिरोली व अन्य गावांमध्ये शिक्षणासाठी ये-जा करतात.

या गावाच्या आधी शंभर मीटर अंतरावर पोटफोडी नदी वाहते. हीच स्थिती शेजारच्या माडेमूल गावाची आहे. परंतु नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात अनेक वेळा नदीला पूर येऊन आठ-आठ दिवस संपर्क तुटतो. गावात कुणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेणे अवघड होते. २०१५-१६ मध्ये निकेश बांबोळे या शेतकऱ्याची बैलजोडी पुरात वाहून गेली. तसेच माडेमूल येथील एक इसम वाहून गेला. २०१६-१७ मध्ये चांदाळा येथील पाचव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी नदीच्या पुरात वाहून गेला. त्यानंतर यंदा २१ ऑगस्टला तिसरीचा विद्यार्थी हेमंत निकुरे हादेखील वाहून गेला. परंतु प्रशासनाने कुठलीही मदत केली नाही. गावकऱ्यांनी शोधमोहीम राबवून दुसऱ्या दिवशी दुपारी विहीरगाव येथील पुलाखालून विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

गावात कृषीसहायकाचा पत्ता नाही. तलाठीही येत नाही. पुलासंदर्भात प्रशासनाने काहीही केले नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत उमेदवारांनी पूल तयार करुन देण्याचे आश्वासन दिले. परंतु निवडून आल्यावर प्रत्यक्षात काहीही केले नाही. त्यामुळे कुंभी व माडेमूल गावचे मतदार यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असा इशारा गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेला यश्वगीता गेडाम, देविदास मोहुर्ले, विजय मडावी, तुळशीराम मेश्राम, रिपीन वाटगुरे, मोरेश्वर चौधरी, निवृत्ता नैताम, पुष्पा सोनुले, वैशाली सोनुले, डिम्पल बांबोळे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
630Z5
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना