रविवार, 20 ऑक्टोबर 2019
लक्षवेधी :
  लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्याटक्केवारीचा विक्रम पार करणार: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला विश्वास             प्रचारतोफा थंडावल्या; गुप्त प्रचारात गुंतले उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते             मतविभाजन टाळण्यासाठी पुरोगामी राजकीय पक्ष व संघटनांनी शेकापला मदत करावी-शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांचे आवाहन             विधानसभा निवडणूक: गडचिरोली जिल्ह्यातील ४७० गावांमध्ये दारुमुक्त निवडणुकीचे ठराव, नवऱ्याला दारु पाजणाऱ्या उमेदवारास पाडण्याचा महिलांचा निर्धार             आदिवासींनीच केंद्रातील सरकार व मोदींना पंतप्रधान बनवलं-आलापल्ली येथील प्रचार सभेत भाजपाध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात भाजपची वसंत वारजूरकरांना पहिली पसंती

Wednesday, 18th September 2019 05:37:37 AM

ब्रम्हपुरी, ता.१८: ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व काँग्रेसचे हेवीवेट लीडर विजय वडेट्टीवार यांना शह देण्यासाठी भाजप तेवढ्याच ताकदीच्या उमेदवाराचा शोध घेत असून, वसंत वारजूरकर यांनाच कार्यकर्ते व नेत्यांकडून प्रथम पसंती देण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र हे राजकीय उलथापालथ करणारे क्षेत्र आहे. राज्यात ज्या पक्षाची सत्ता असते, त्या पक्षाचा उमेदवार येथे निवडून येत नाही, असा मागील ८ निवडणुकांचा अनुभव आहे. २०१४ मध्ये चिमूरहून येऊन विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरीतून काँग्रेसपक्षातर्फे निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. पुन्हा ते ब्रम्हपुरी क्षेत्रातूनच निवडणूक लढविणार आहेत.वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेतही वडेट्टीवारांनी विजयश्री खेचून आणली. यावेळीही वडेट्टीवार तोच करिश्मा दाखविणार तर नाही ना, या भीतीने २२०जागांचेलक्ष्यठेवलेल्या भाजप नेत्यांना ग्रासले आहे.

त्यामुळे वडेटटीवारांना शह देण्यासाठी  भाजपने तगड्या उमेदवाराचा शोध घेणे सुरु केले आहे. वसंत वारजूरकर, माजी आमदार प्रा.अतुल देशकर,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या नावावरही भाजपात मंथन सुरु आहे. मात्र, प्रा.अतुल देशकर यांचा जनसंपर्क पूर्वीसारखा राहिला नाही. क्रिष्णा सहारे यांची संपूर्ण विधानसभा क्षेत्रात ओळख नाही, तर संदीप गड्डमवार यांच्याकडे भाजप विश्वासाने पाहत नाही. प्रंचित पोरेड्डीवार हे ब्रम्हपुरी क्षेत्रासाठी खूपच नवखे आहेत. प्रा.अतुल देशकर यांच्या विरोधात पक्षातील तिन्ही तालुक्यांतील ओबीसी लॉबी मागील काही दिवसांपासून सक्रिय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशकरांना तिकिट म्हणजे वडेट्टीवारांना आयती संधी, असा युक्तिवाद त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून केला जात आहे.

वडेट्टीवार यांची कार्यशैली आणि निवडणुकीतील व्यवस्थापनाची भाजप नेत्यांना कल्पना आहे. त्याअनुषंगाने भाजप तोडीस तोड उमेदवार शोधत असून, वसंत वारजूरकर यांचे नाव आघाडीवर आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली अशा तिन्ही तालुक्यांमध्ये वारजूरकरांचा परिचय आणि संपर्क आहे. चिमूरच्या धर्तीवर ब्रम्हपुरीचाही विकास करण्याचा वारजूरकरांचा मानस आहे. चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे वारजूरकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, भांगडियांचा उमेदवार म्हणून वारजूरकरांकडे पाहिले जात आहे. आ.भांगडिया यांची ताकद सोबत असल्याशिवाय ब्रम्हपुरीतून भाजपचा उमेदवार निवडून येणे शक्य नाही, अशी सध्याची स्थिती आहे.  शिवाय वसंत वारजूरकर यांना २००९ मध्ये चिमूर क्षेत्रातून विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात लढण्याचा अनुभव आहे. त्यावेळी वारजूरकरांनी वडेट्टीवारांना जबरदस्त टक्कर दिली होती.

तत्पूर्वी २००४ मध्ये वसंत वारजूरकर यांनी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. अवघ्या दीड वर्षाच्या जनसंपर्कातून त्यांनी त्यावेळी २४ हजार मते मिळविली होती. या बाबी वसंत वारजूरकरांसाठी सकारात्मक ठरत आहेत. याशिवाय, ब्रम्हपुरी क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार खूप मते घेईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल, अशा भ्रमात न राहता वारजूरकरांसारखा तगडा उमेदवार वडेट्टीवारांच्या विरोधात उभा करावा, असा मतप्रवाह भाजपच्या तिन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे दिसून येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
09E59
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना