मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

किशन नागदेवे भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष

Monday, 16th September 2019 07:26:21 AM

गडचिरोली, ता.१६: देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते किशन नागदेवे यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री.नागदेवे यांची नियुक्ती केली असून, तसे पत्र आज नागदेवे यांना प्रदान करण्यात आले. खासदार अशोक नेते यांची भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून १६ जानेवारी २०१६ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना ३ वर्षे पूर्ण झाल्याने नागदेवे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागच्या वर्षी खासदार अशोक नेते यांना भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.

कुशल संघटक व रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या किशन नागदेवे यांनी देसाईगंज नगर परिषदेचे अध्यक्ष् म्हणून यशस्वीरित्या धुरा सांभाळली आहे. शिवाय २०१० ते २०१६ अशी सहा वर्षे ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांच्याच कार्यकाळात जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रांत भाजपचे आमदार विजयी झाले होते. सध्या ते भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
G4KAA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना