मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

ग्यारापत्ती जंगलात दोन नक्षल्यांना कंठस्नान

Sunday, 15th September 2019 06:52:54 AM

कोरची,ता.१५ :  तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात आज पहाटे पोलिसांच्या सी- ६० पथकातील जवानांशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीत चार ते पाच नक्षली जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

लालसू उर्फ शांताराम देवराव गावडे, रा.मुरगाव, ता.धानोरा व समिला रा.बस्तर(छत्तीसगड) अशी मृत नक्षल्यांची नावे आहेत. लालसू गावडे हा कंपनी क्रमांक ४ मध्ेय प्लाटून पार्टी कमिटी मेंबर म्हणून, तर समिला ही कंपनी क्रमांक ४ मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. दोघांवर प्रत्येकी ४ लाख रुपयांचे बक्षीस होते.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, सी- ६० पथकाचे जवान ग्यारापत्ती जंगलात कालपासून नक्षलविरोधी अभियान राबवीत होते.दरम्यान, आज पहाटे ग्यारापत्तीनजीकच्या नारकसा जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला.  पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. ही चकमक अर्धा तास चालली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दोन नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घटनास्थळावरुन पोलिसांनी नक्षल्यांचे दैनंदिन वापराचे साहित्य, एक कार्बाइन, एक बारा बोअर बंदूक, राऊंड, भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचे साहित्य, दुर्बिण, वॉकिटॉकी, रेडिओ ताब्यात घेतले. या चकमकीत ४ ते ५ नक्षली जखमी झाल्याचा अंदाज पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला आहे. श्री.बलकवडे यांनी सी-६० पथकाच्या जवानांचे कौतूक केले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
085R1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना