शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोलीच्या हर्षदा गेडाम यांना मुंबईच्या सौंदर्य स्पर्धेत दोन पुरस्कार

Friday, 13th September 2019 06:58:48 AM

गडचिरोली, ता. १३ : मुंबई येथे करिस्मा पेजंट प्रायव्हेट लिमीटेड परमार्थ डेस्टीट्यूट फाउंडेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत गडचिरोलीच्या हर्षदा  गेडाम यांनी घवघवीत यश प्राप्त करत दोन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत.
हर्षदा गेडाम ह्या गडचिरोली येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत गेडाम यांच्या पत्नी  असून, त्यांनी माहिती व तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मुंबईतील जुहू येथे पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी मिसेस इंडिया फर्स्ट रनरअप पुरस्कारासहमिसेस फोटोजेनिक' हा पुरस्कारसुद्धा पटकावला. ही स्पर्धामिस इंडिया, ‘मिसेस इंडिया (रेग्युलर) मिसेस इंडिया (क्लासिक) अशा तीन श्रेणीत घेण्यात आली होती. या स्पर्धेत हर्षदा गेडाम यांनी दोन पुरस्कार पटकावून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पती  डॉ. श्रीकांत भगवंत गेडाम यांच्यासह परिवाराला दिले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
GPASJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना