शुक्रवार, 24 जानेवारी 2020
लक्षवेधी :
   गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार जाहीर             विकासाद्वारेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपविणार-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन             ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाभरात केले धरणे आंदोलन             पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

भामरागड वगळता सर्व मार्ग सूरू

Sunday, 8th September 2019 01:43:25 PM

 गडचिरोली, ता.8 : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळणारा मुसळधार पाऊस थांबला असून भामरागड वगळता सर्व प्रमुख रस्त्यावरची वाहतूक सुरु झाली आहे. आजपर्यंत 1687.1 मिलिमीटर इतका पावसाची नोंद झालेली आहे. 

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात १७ मार्ग बंद झाले होते पैकी काल व आज कमी पावसामुळे त्यातील 16 मार्ग सुरू झाले असून भामरागड- आलापल्ली  मार्ग सध्या बंद आहे.
काल अहेरी तालुक्यातील देवालमारी नाल्यातून येताना विजेच्या धक्क्याने 25 जनावरांचा मृत्यू झाला . दरम्यान आज सकाळी तेलंगणा राज्यातील 4 जण गोदावरी नदीच्या पुरात अडकले होते.त्यांना असरअली पोलिसांनी बोट पाठवून सुरक्षितरित्या बाहेर काढले. पुरात अडकलेल्या 500 मेंढयांना बाहेर काढण्याचेत आले आहे. दरम्यान, काल जिल्हाधिकारी शेखर सिंह  व पोलीस अधोक्षक शैलेश बलकवडे यांनी हेलिकॉप्टर ने भामरागड चा दौरा करून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. तेथील पाचशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0NDIK
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना