शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गोसेखुर्द, चिचडोह धरणातून मोठा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Friday, 6th September 2019 08:43:17 PM

गडचिरोली, ता.७:अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणखी भयावह होत असून, गोसेखुर्द व चिचडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोसेखुर्द धरणाचे २५ दरवाजे दीडमीटरने, तर ८  दरवाजे १ मीटरनेउघडण्यात आले असून, त्यातून ९८१६ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे उघडण्यात आले असून,त्यातून १८२०४ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील गावांना बाहेर न पडण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्याने पुन्हा पूर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. काल रात्री १० वाजतापासून आष्टी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर पाणी चढल्याने आष्टी-चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे. दिना नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने आष्टी-मुलचेरा हा मार्गही दोन दिवसांत दुसऱ्यांदा बंद झाला आहे. गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-चामोर्शी व्‍ आलापल्ली-भामरागड हे प्रमुख मार्ग आधीच बंद झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल १९ मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
H3440
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना