शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

गडचिरोली जिल्ह्यात भयावह पूर परिस्थिती: हजारो गावांचा संपर्क तुटला, शेकडो घरे क्षतिग्रस्त

Friday, 6th September 2019 01:22:42 PM

गडचिरोली,ता.६: मागील पाच दिवसांपासून अतिवृष्टी होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद झाले असून, हजारो गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे, तर अनेक ठिकाणी ये-जा करणारे नागरिक अडकून पडले आहेत. अनेक गावांमध्ये शेकडो घरे क्षतिग्रस्त्‍ झाली आहेत. गडचिरोली-नागपूर मार्ग बंद झाला आहे.

दरम्यान, गोसेखुर्द धरणाचे १९दरवाजे दीडमीटरने, तर १४ दरवाजे १ मीटरनेउघडण्यात आले असून, त्यातून ९२३४क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा पूर परिस्थिती भयावह होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तब्बल १७ मार्ग बंद असल्याने हजारो गावांचा संपर्क तुटला आहे.

गोगावनजीकच्या पाल नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने गडचिरोली-नागपूर मार्ग, तसेच शिवणी नाल्यावर पूर असल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गही बंद झाला आहे.

कुरखेडा-वैरागड-रांगी, आलापल्ली-भामरागड, कमलापूर-रेपनपल्ली, आरमोरी-देसाईगंज, शंकरपूर-बोडधा, फरी-किन्हाळा, एटापल्ली-आलापल्ली, भामरागड-लाहेरी, चातगाव-पेंढरी, मानापूर-पिसेवडधा, हल्दी-डोंगरगाव, कोरची-बोटेकसा, धानोरा-मालेवाडा, चोप-कोरेगाव, वैरागड-वासाळा हे मार्ग बंद झाले आहेत. सिरोंचा तालुक्यातील मोसम गावाजवळ पुरामुळे वाहतूक ठप्प्‍ झाली आहे. कुरखेडा-वैरागड मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गावर मोसम-नंदीगाव-झिमेला नाल्यावर पाणी असल्याने दोन्ही बाजूंना वाहने अडकली आहेत. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे मध्यरात्री पुराचे पाणी गावात शिरल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मदत कार्य करीत आहे. वैरागड येथे २० हून अधिक घरे क्षतिग्रस्त झाली आहेत. हीच स्थिती अनेक खेड्यांमध्येही आहे.

आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील २५ नागरिक पुरात अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन विभाग व पोलिसांनी त्यांना बोटीद्वारे सुरक्षितरित्या बाहेर काढले. कुरखेडा तालुक्यातील जुनी अरततोंडी येथील शंभर नागरिकांना सकाळी सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले, तर अन्य शंभर जणांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

मागील चोवीस तासांत आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा येथे सर्वाधिक २३४.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UUZ8J
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना