गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019
लक्षवेधी :
  अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनच्या वार्षिक संमेलनात २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांची बीजभाषणे             गडचिरोलीचे खनिकर्म अधिकारी श्रीकांत शेळके एसीबीच्या जाळ्यात, रेती वाहतुकीचा परवाना देण्यासाठी कंत्राटदाराकडून स्वीकारली १ लाख २० हजारांची लाच             जिल्ह्यात ईद-ए-मिलादुन्नबी सण उत्साहात साजरा             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

‘प्लॅटिनम’च्या ओमला मार्शल आर्टमध्ये सुवर्णपदक

Tuesday, 27th August 2019 02:40:45 PM

गडचिरोली, ता.२७: येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचा सातव्या वर्गातील विद्यार्थी ओम पंकज बोंद्रे याने हिमाचल प्रदेशातील सिमला(रोहू) येथे झालेल्या राष्ट्रीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्ण व कांस्य पदक पटकावले आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरण, युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त सिकाई फेडरेशन ऑफ इंडियांतर्गत सिकाई असोसिएशन हिमाचलप्रदेश यांच्या वतीने २० ते २३ ऑगस्टदरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली. यापूर्वी २ व ३ ऑगस्ट रोजी नाशिक येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सिकाई मार्शल आर्ट स्पर्धेत ओमने दोन सुवर्णपदके प्राप्त करीत क्रीडा तज्ज्ञांची मने जिंकली होती. आता राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने ओमला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. ओमचे वडील बिल्डर   असून, आई गृहिणी आहे.

या यशाबद्दल प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे सचिव अझिझ नाथानी, संचालक निझार देवानी, प्राचार्य प्रदीप मिस्त्री यांनी ओमचे अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
I559M
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना