शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

अरुण पेंदोरकर यांची वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या केंद्रीय सहचिटणीसपदी नियुक्ती

Tuesday, 27th August 2019 07:06:03 AM

गडचिरोली, ता.२७: येथील वनपाल अरुण पेंदोरकर यांची महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या केंद्रीय सहचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली  आहे.महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना तसेच वनमजुर,वनकर्मचारी व वन क्षेत्रीय कर्मचारी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी पेंदोरकर यांची  नियुक्ती केली आहे.  

अरुण पेंदोरकर यांनी आजपर्यंत महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेच्या वनवृत्ताची जवाबदा निष्ठेने  पार पाडली.   वनरक्षक व  वनपालांच्या विविध मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न्‍ केला आहे. या कार्याची दखल घेत अजय पाटील यांनी पेंदोरकर यांची संघटनेच्या केंद्रीय सहचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.  या नियुक्तीबद्दल अरुण पेंदोरकर यांचे वनकर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6BA2E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना