मंगळवार, 16 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

जवखेडच्या दलित हत्याकांडाचा माओवाद्यांनी केला निषेध!

Saturday, 15th November 2014 02:28:50 AM

 
गडचिरोली, ता़१५
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड येथील दलित हत्याकांडाबाबत माओवाद्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, ही घटना खैरलांजी हत्याकांडाची पुनरावृत्ती असल्याचे मत माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य सचिव सह्याद्री याने पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे़ अशा घटनांचा रस्त्यावर उतरून प्रतिकार करा, असे सांगून सह्याद्रीने जाती निर्मुलन संघटना स्थापन करण्याचे आवाहन केले आहे़
सह्याद्री याने जवखेड हत्याकांडाबाबत प्रसारमाध्यमांना एक पत्र पाठविले आहे़ त्यात त्याने म्हटले आहे की, जवखेड येथे एकाच दलित कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे़ हे कृत्य घृणास्पद व मानवतेला काळीमा फासणारे असून, ते फॅसिस्ट शक्तींकडून केले जात आहे़ सरकार बदलल्यानंतर मुस्लीम व दलितांवरील हल्ले वाढल्याची टीका सह्याद्रीने केली आहे़ दलित शक्तींनी एकत्र येऊन जवखेडच्या दलित हत्याकांडाचे सडेतोड उत्तर द्यावे, असे सांगून सह्याद्रीने गावागावात जाती निर्मुलन संघटना स्थापन करण्याचे आवाहन केले आहे़
सह्याद्रीने पत्रकाद्वारे केलेल्या उपरोक्त आवाहनातून आता नक्षलवादी दलितांचा आक्रोश कॅश करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सिद्ध होत आहे़ 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7CKM6
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना