शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

अतुल मल्लेलवार यांची युवक काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती

Saturday, 24th August 2019 08:00:49 AM

 

गडचिरोली, ता.२४: येथील युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल मल्लेलवार यांची युवक काँग्रेसच्या प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.

अतुल मल्लेलवार यांची १३  ऑगस्ट रोजी जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मुंबई येथे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते. परंतु जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे

यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर दोन दिवसांतच नियुक्तीसंदर्भात खुलासा करण्यात आला. शिवाय प्रदेश चिटणीस शिवाणी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात अतुल मल्लेलवार, कुणाल पेंदोरकर आदींनी केलेल्या खड्डेविरोधी आंदोलनात महेंद्र ब्राम्हणवाडे व त्यांचे सहकारी सहभागी झाले नव्हते. या गटबाजीची गंभीर दखल घेत युकाँध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्याना आज नागपूरला बोलावून मधला मार्ग काढत अतुल मल्लेलवार यांची प्रदेश चिटणीसपदी पदोन्नती केल्याचे पत्र त्यांना दिले. याप्रसंगी अतुल मल्लेलवार यांचा शाल देऊन सत्कारही केला.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस प्रभारी प्रतिभा रघुवंशी, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश चिटणीस शिवाणी वडेट्टीवार, विश्वजीत कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर, आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, लॉरेन्स गेडाम, पंकज बारसिंगे, मनोज कामडी उपस्थित होते.   

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
FT986
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना