रविवार, 22 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  आष्टीच्या ठाणेदाराची सुशिक्षित दाम्पत्यास अभद्र वागणूक- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे केली तक्रार             आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती             निष्कृष्ट बंधारा बांधकाम प्रकरणी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

शेकाप गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काढणार जनसंवाद यात्रा

Saturday, 17th August 2019 12:09:22 PM

गडचिरोली, ता.१७:शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या विकासासाठी गेल्या ७२ वर्षातील योगदान आणि पक्ष कार्य घराघरात पोहचविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते व शेकापच्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या संभाव्य  उमेदवार जयश्री वेळदा यांच्या नेतृत्वात पक्षाच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये लवकरच ‘जनसंवाद- विकासाच्या शोधात शेकापची यात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे.

या यात्रेदरम्यान जिल्हा परिषद.क्षेत्रनिहाय गावांमध्ये जाऊन गावातील मुख्य चौकात छोटेखानी सभा घेऊन सध्याच्या सरकारने केलेल्या विकासाबद्दल जनतेची मते जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच विकासासंबंधाने जनतेची नेमकी काय अपेक्षा आहे,हे जाणून घेण्यात येणार आहे. तसेच शेकापची  विधानसभा निवडणूक लढविण्यामागील भूमिका लोकांपुढे मांडण्यात येणार आहे. 

या यात्रेकरिता स्टेज,स्पीकर, एलईडी टीव्हीने सज्ज असलेला एक प्रपोगंडा ट्रक व दोन चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही यात्रा सकाळी  ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत राहणार असल्याची माहिती शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी दिली..

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
7GHU5
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना