शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

युवक काँग्रेसच्या आंदोलनाचा दणका: बांधकाम विभागाने तत्काळ बुजविले खड्डे

Saturday, 17th August 2019 04:41:29 AM

गडचिरोली, ता.१७: रस्त्यांवरील खड्डे जीवघेणे ठरत असून, खड्डे तत्काळ बुजविण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस शिवाणी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज कार्यकर्त्यानी चामोर्शी मार्गावर आंदोलन करुन खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे रोवली..

चामोर्शी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अलीकडेच आलेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यावेळी बरेच जण खाली कोसळून पडले. तरीही प्रशासनाने हे खड्डे बुजविले नाहीत. राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य खड्डेमुक्त करु व मुख्य मार्गावर खड्डा दाखवेल त्याला १ हजार रुपये बक्षीस देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा हवेतच विरली. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यर्क्त्यानी आज आंदोलन केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन  आंदोलनकर्त्याशी चर्चा  केली. निविदा मंजूर होईपर्यंत रस्त्याचे काम करता येणार नाही, असे अभियंत्यांनी सांगितल्याने कार्यकर्ते संतापले. त्यामुळे अभियंत्यांनी ३ दिवसांत सर्व खड्डे बुजवून रस्त्याचे काम करु, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल मल्लेलवार, जिल्हा महासचिव कुणाल पेंदोरकर, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष भावनताई वानखेडे, आशा मेश्राम,तौफिक शेख , विशाल निकोसे, विक्की रामटेके, सचिन येणप्रेड्डीवार, सूरज कोडापे, सुमेध वाळके, साजिद बारसागडे, पंकज बारसिंगे, मनोज कांबळी, सर्वेश पोपट, अक्षय चौधरी, सूरज तिसरे,राकेश गणवीर, कल्पक मुप्पीडवार, दिनेश मोहूर्ले, पंकज कोकोडे, सुखदेव बावणे,राजू वाढई, सचिन मोहूर्ले, संदीप गुरनुले, विजय वाढई,सौरव मोहूर्ले, राहूल जुवारे  यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

बांधकाम विभागाने बुजविले खड्डे

युवक काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस शिवाणी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावण्याचे आंदोलन केल्यानंतर खळबळून जागे झालेल्या बांधकाम विभागाने दुपारी ४ वाजतापासून चामोर्शी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. युकाँच्या दणक्यामुळेच आता सामान्य नागरिकांचे हाल थांबणार आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VJK64
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना