शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

प्रा़ राजेश कात्रटवार यांच्या मातोश्री कमलताई कात्रटवार यांचे निधन

Saturday, 15th November 2014 04:51:01 AM

 
गडचिरोली, ता़१५
येथील नगरसेवक प्रा़ राजेश कात्रटवार यांच्या मातोश्री व राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षिका कमलताई केशवराव कात्रटवार यांचे आज(ता़१५)सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी नागपुरातील अर्नेजा इस्पितळात दीर्घ आजाराने निधन झाले़ त्या ७२ वर्षांच्या होत्या़ त्यांच्या पश्चात प्रा़ राजेश कात्रटवार व अरविंद कात्रटवार ही मुले, ३ मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे़ 
कमलताई कात्रटवार यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने मागील १५ दिवसांपासून त्यांच्यावर नागपुरातील अर्नेजा इस्पितळात उपचार सुरू होते़ मध्यंतरी त्यांच्याा प्रकृतीत सुधारणाही झाली होती़ परंतु आज भल्या सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली़ कमलार्इंच्या निधनाचे वृत्त कळताच शहरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली़ जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, खा अशोक नेते, आ डॉ देवराव होळी, आ विजय वडेट़टीवार, नगराध्यक्ष निर्मला मडके आदींनी प्रा़ राजेश कात्रटवार यांच्या घ्ररी जावून त्यांचे सांत्वन केले त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर कमलताईंच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड़डीवार, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या
कमलताई कात्रटवार ह्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेत व नंतर गडचिरोली येथील नगर परिषद शाळेत अनेक वर्षे मुख्याध्यापिका होत्या़ राज्य शासनाने त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित केले होते़ सेवेत असताना त्यांनी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले़ सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेतला़ अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांशी त्यांची जवळीक होती़ 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6CQ1K
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना