गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

खड्ड्यात गेले रस्ते; युवक काँग्रेस १७ ऑगस्टला करणार आंदोलन

Friday, 16th August 2019 08:03:11 AM

 

गडचिरोली, ता.१६: रस्त्यांवरील खड्डे जीवघेणे ठरत असून, खड्डे तत्काळ बुजविण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसतर्फे शनिवारी(ता.१७) सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर आंदोलन करण्यात येणार आहे.

चामोर्शी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अलीकडेच आलेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यावेळी बरेच जण खाली कोसळून पडले. तरीही प्रशासनाने हे खड्डे बुजविले नाहीत. राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यखड्डेमुक्तकरु व मुख्य मार्गावर खड्डा दाखवेल त्याला १ हजार रुपये बक्षीस देऊ, अशी घोषणा केली होती. मात्र,ही घोषणा हवेतच विरली. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस आंदोलन करणार असून, कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल मल्लेलवार व महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VQI4W
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना