रविवार, 22 सप्टेंबर 2019
लक्षवेधी :
  आष्टीच्या ठाणेदाराची सुशिक्षित दाम्पत्यास अभद्र वागणूक- जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे केली तक्रार             आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती             निष्कृष्ट बंधारा बांधकाम प्रकरणी मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता व कंत्राटदारावर कोरची पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

विद्यार्थ्यांनी मोठे होऊन वैज्ञानिक व्हावे: नगराध्यक्षा योगिता पिपरे

Wednesday, 14th August 2019 01:55:36 PM

 

गडचिरोली,ता.१४: वैज्ञानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा विकास साध्य करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानविषयाची आवड निर्माण करून त्यांना विकासाची जोड देणे महत्त्वाचे आहे. शालेय जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनातून अंगभूत ज्ञान विकसीत करीत विद्यार्थ्यांनी मोठे होऊन वैज्ञानिक व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा गडचिरोली येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या उपक्रमांतर्गत नावीण्यपूर्ण विज्ञान केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्या  हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या शिक्षण समिती सभापती वर्षा बट्टे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी संजीव ओहोळ, नगरसेवक संजय मेश्राम, नगरसेविका रंजना गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्षा पिपरे पुढे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी यशाची पायरी चढताना कोणत्याही अहंकारात न जाता शैक्षणिक जीवनात सातत्य ठेवावे. समाजासाठी कार्य करण्याची धडपड अंगी बाळगावी. विकासाच्या वाटेवर सतत कार्यरत असावे. सामान्य परिस्थितीतून मिळविलेले यश निरंतर आपल्या ध्यानात ठेवावे. शाळेत प्रयोगशाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी या प्रयोगशाळेतून भविष्यात वैज्ञानिक होण्याचे ध्येय बाळगावे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या  हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, बूट आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी सुध्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कर्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंगला रामटेके यांनी केले. संचालन संध्या चिलमवार तर आभार पेंदाम यांनी मानले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वऱ्हाडे,.उपाध्यक्षा मिस्त्री, सर्व सदस्य, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IVEE9
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना