शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग,मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

Tuesday, 13th August 2019 02:17:16 AM

कुरखेडा,ता.१३: अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या एका खासगी अनुदानीत आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर कुरखेडा पोलिस ठाण्यात सोमवारी(ता.१२ )गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बेनुदास देशमुख असे आरोपीचे नाव असून, तो कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी येथील महादेवगड आश्रमशाळेत प्राथमिक मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुख्याध्यापक बेनुदास देशमुख याने ४ आगस्ट रोजी पीडित विद्यार्थिनीच्या घरी जाऊन तिचा विनयभंग केला. पीडित विद्यार्थिनीने संध्याकाळी आपल्या आईला आपबिती सांगितली. त्यानंतर आई-वडिलांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे मार्गदर्शन घेऊन १२ ऑगस्ट रोजी कुरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत कुरखेडा पोलिसांनी आरोपी बेनुदास देशमुखविरुद्ध भादंवि ३५४(अ) ,बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम१०,१२ व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये  गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापक फरार झाल्याचे समजते. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

 

 

 

 

   


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
9444U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना