गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Tuesday, 6th August 2019 08:58:52 AM

गडचिरोली, ता.६: शेताजवळच्या तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मंथीर पुनाराम मडावी(४७)रा.सोनपूर, ता. कोरची असे शिक्षा झालेल्या इसमाचे नाव आहे.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, पीडित १२ वर्षीय मुलगी ही तिच्या मैत्रिणींसोबत तिच्या शेताजवळच्या तलावावर आंघोळीसाठी गेली होती. त्याच तलावावर मंथीर मडावी हादेखील आंघोळीसाठी आला होता. यावेळी पीडित मुलीच्या मैत्रिणी आंघोळ करुन घरी गेल्या. मात्र, आंघोळीनंतर पीडित मुलगी आपल्या शेतावर जाऊन झुल्यावर झुलत होती. त्यावेळी मंथीर मडावी याने तिला गॅरापत्तील मार्गावरील झुडपी जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन कोरची पोलिसांनी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी आरोपी मंथीर मडावी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६, ५०६, तसेच बा.लै.अ. कायद्याच्या कलम ४ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण होताच पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. मुख्य  जिल्हा व सत्र न्यायाधीश  आर. एन.  मेहरे  यांनी  पीडित मुलीचे बयाण, वैद्यकीय अहवाल, इतर परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेऊन, तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी मंथीर मडावी यास १० वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक शरद मेश्राम यांनी जबाबदारी सांभाळली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SHV5F
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना