गुरुवार, 28 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

चंदनवेलीत दोन महिन्याच्या मुलीचा गळा दाबून खून

Friday, 14th November 2014 08:34:44 AM

 
गडचिरोली, ता़१४
पतीसोबत भांडण्‍ झाल्याने राग अनावर होऊन एक क्रूर मातेने आपल्या दोन महिन्याच्या मुलीचा गळा दाबून खून केला़ त्यानंतर तिचा मृतदेह शेजारच्या विहिरीत फेकल्याची घटना काल १३ नोव्हेंबरच्या रात्री एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथे घडली़ दर्शना किरण भांडेकर(२५) असे आरोपी महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे़
किरण व दर्शना भांडेकर यांना एक दोन वर्षाची व दुसरी दोन महिन्यांची मुलगी आहे़ काल रात्री दर्शनाचे तिच्या पतीशी कडाक्याचे भांडण झाले़ त्यानंतर दर्शना आपल्या दोन्ही मुलींना घेऊन बाहेर जाण्यास निघाली़ मात्र, पतीने मोठ्या मुलीला दर्शनाच्या तावडीतून सोडवून घरी आणले़ त्यानंतर गावाबाहेर जाऊन दर्शनाने दोन महिने वयाच्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि तिला विहिरीत फेकले़ काही वेळाने दर्शना घरी आली आणि तिने आपल्या पतीला हकीकत सांगितले़ यामुळे गावात एकच खळबळ माजली़ आज १४ नोव्हेंबरला बोलेपल्ली पोलिसांनी दर्शनावर गुन्हा दाखवून तिला अटक केली़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
MWN3U
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना