गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

वीज पडून तीन महिला जखमी, वालसरा येथील घटना

Thursday, 13th November 2014 07:05:44 AM

 
गडचिरोली, ता़१३ 
शेतात धान कापणी करीत असताना वीज कोसळल्याने तीन महिला जखमी झाल्याची घटना आज (ता.१३) दुपारी २ वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील वालसरा येथील शेतशिवारात घडली. 
मनिषा नीळकंठ सदूके (३५), मंदाबाई शामराव कुलकलवार (४०) व महानंदा उमाजी मडावी (३७) तिघीही रा.वालसरा, अशी जखमींची नावे आहेत. सध्या जिल्हाभरात धान कापणीची कामे जोमाने सुरू आहेत. तिन्ही महिला आज शेतात धान कापणी करीत असताना दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. त्याच सुमारास अंगावर वीज कोसळल्याने तिन्ही महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VELQ1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना